Pikvima Kharip Rabbi Sowing Certificate /Pikpera : खरीप रब्बी पिकपेरा प्रमाणपत्र

1 Rs Pikvima Sowing Certificate, Pikvima Kharip Rabbi Pikpera Format PDF, Word.खरीप रब्बी पिकपेरा प्रमाणपत्र फॉर्मेट तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.


Pikvima Kharip Rabbi Sowing Certificate /Pikpera : खरीप रब्बी पिकपेरा प्रमाणपत्र


प्रधानमंत्री विकविमा योजना : Pradhanmantri Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदरची योजना

खरीप हंगाम २०२२ व रब्बी हंगाम २०२२-२३ करिता Cup & Cap Model (८०:११०) नुसार राबविण्यात आली आहे. केंद्र शासनाने संदर्भ क्र. ४ अन्वये Cup & Cap Model (८० : ११०), Cup & Cap Model (६० : १३० ) Profit & Loss Sharing Model यापैकी एका मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करणेकरीता मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी तीन वर्षांकरीता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 

विमा संरक्षणाच्या बाबी: Kharip Rabbi Pikvima 

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुढील कारणामुळे म्हणजेच शेतकऱ्यांस टाळता न येण्या जोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल.

 

७.१) प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी/ लावणी / उगवण न होणे : ( Prevented Sowing / Planting / Germination) हंगामातील अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी / लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी / लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.

 

७.२) हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान (On Account Payment of claims due to Mid- Season Adversity) हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील.

 

७.३) पिक पेरणीपासून काढणी पर्यन्तच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट (Standing Crops): दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, किड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पादनात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल.

 

७.४) स्थानिक नैसर्गिक आपत्ती: (Localized Calamities)

 

या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येईल.

७.५) काढणी पश्चात नुकसान: (Post-Harvest Losses)

ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.


पिक विमा भरत असताना लागणारी कागदपत्रे : Required document for Pikvima Kharip, Rabbi Season

1.बँक पासबुक- Bank Passbook

2. आधार कार्ड - Aadhaar Card

3. सातबारा,आठ अ - Land Record

4. पिक पेरा स्वघोषणापत्र किंवा Sowing सर्टिफिकेट - Sowing Certificate

5. भाडे करार प्रमाणपत्र /समंतीपत्र -Tenanat Certificate

 

पिक पेरा किंवा स्वघोषणापत्रे कसे असते याचा नमुना खाली दिलेला आहे तो तुम्ही पाहून स्वतः बनवू शकता किंवा खाली दिलेल्या डाउनलोड करून त्यामध्ये तुमची माहिती भरू शकता.

 Pikvima Kharip Rabbi Sowing Certificate /Pikpera  Download 


Pikpera डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रथम टेलिग्राम चैनल जॉईन करावे लागेल तेथे तुम्हाला या pikpera देण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post