Mahatma Jyotiba Phule Karjmukti
Yojana List Download : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ति योजना
Mahatma Jyotiba Phule Karjmukti Yojana ,Karjmafi शेतकऱ्यांना मिळणारा लाभ:
नियमित कर्जपरतफेड
करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18,
सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक
वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड
केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2018 पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2019 पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल.
त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत:
परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक
कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत
प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मात्र,
सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक
कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या
रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
प्रोत्साहनपर लाभ
देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या
अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50
हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात
येईल.
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ति योजना List :
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी (Mahatma Jyotiba Phule Karjmukti Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 31 मार्चपर्यंत जमा होणार आहे. आणि त्या संदर्भातच आता चौथी यादी सुद्धा जाहीर झालेले आहे. तुम्ही तुमचं नाव हे आता चेक करू शकता या पोस्ट मध्ये आपण यादी सुद्धा तुम्हाला डाऊनलोड कशी करायची हे पाहणार आहोत.
ही यादी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र (Aaple
Sarkaar Seva Kendra) किंवा सीएससी (CSC) केंद्रामध्ये
भेटणार आहे फक्त मी तुम्हाला ही यादी सीएससी केंद्र चालक कशा पद्धतीने डाऊनलोड
करतात हे दाखवतो.
Source : https://mjpskyportal.maharashtra.gov.in/
महात्मा
ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी कशी Download करायची:
1.सर्वप्रथम
सीएससी म्हणजेच डिजिटल वेल पोर्टल (https://digitalseva.csc.gov.in/)लॉगिन करायचे आहे. तिथे सर्च
बॉक्स मध्ये mahatma हे सर्च करायचे आहे.
2.त्यानंतर
खाली Mahatma Jyotiba Phule Karjmukti Yojana in Government दिसेल
त्यावर क्लिक करायचे आहे.
3.त्यानंतर
तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले या पोर्टलवर जातात त्यामध्ये आता तुम्हाला विशिष्ट
प्रमाण ( Vishisht Kramank) टाकून किंवा शेतकऱ्याचा आधार क्रमांक Aadhaar Number टाकून या लिस्टमध्ये शेतकऱ्याचे नाव आहे का नाही हे चेक करता येईल.
आधार
प्रमाणीकरणासाठी यादी डाऊनलोड:
4.जर
तुम्हाला पूर्ण गावाची यादी डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही शेजारील Aadhaar
Authentication List Download डाउनलोड बटनावर क्लिक करा.
त्यामध्ये
तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची लिस्ट दिसेल सर्च बॉक्स मध्ये तुम्ही तुमच्या गावचे नाव
सर्च करू शकता मग गावाची लिस्ट डाऊनलोड करता येईल ज्या शेतकऱ्याचे नाव या
लिस्टमध्ये असेल त्यांना 30 मार्च 2023 पूर्वी केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे.
5.केवायसी
पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक कर्ज खाते क्रमांक,(Bank
Account Number) आधार क्रमांक (Aadhaar No) व
मोबाईल क्रमांक याची आवश्यकता पडेल. केवायसी तुम्ही ओटीपी द्वारा किंवा Biometric
द्वारा करू शकता.
6.तुमची
केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट देण्यात येईल.10-15 दिवसातच तुमच्या बँक अकाउंट मध्ये 50 हजार जे की
प्रोत्साहन पर रक्कम आहे ते जमा होईल.
महात्मा ज्योतिबा
फुले कर्ज माफी याची लिस्ट डाऊनलोड करताना तुम्हाला काही अडचण येत असतील तर तुम्ही
खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
Post a Comment