Talathi Bharti 2023- महाराष्ट्र तलाठी भरती जाहिरात अर्ज
Talathi Bharti 2023 - जाहिरात, अर्ज सुरु होण्याची तारीख, Talathi
Bharti Required Documents.
Talathi Bharti 2023,
Maharashtra Talathi Recruitment, Maharashtra Mahsul Vibhag Talathi Bharti 2023,
Check Maha Talathi Bharti Eligibility Criteria, Age Limit, Salary, Application
Fee.
महाराष्ट्र सरकार,
महसूल विभाग लवकरच तलाठी रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
आयोजित करणार आहे.
लवकरच उमेदवारांना
महाराष्ट्र तलाठी भारतीची तपशीलवार सूचना PDF स्वरूपात
मिळेल.
तलाठी
म्हणजे काय?
तलाठी हा शासनाचा
प्रतिनिधी असतो. त्याला सूक्ष्म दृष्टीने काम करावे लागते. त्याला व्यावसायिक आणि
सक्षम अधिकारी म्हणून जमीन प्रशासन, सरकारी
वसुली आणि जनसंपर्क यासारखी कर्तव्ये पार पाडावी लागतात.
तलाठ्याच्या
कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 1 ते 3 गावाच्या समूहास एक तलाठी असतो.
सज्यातील सर्व
गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा
तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो.
तलाठ्याचे कार्य :Talathi Bharti
·
महसूल विभागातील
खेडेगावातील प्रमुख अधिकारी म्हणजे तलाठी होय. तलाठी हा वर्ग 3
चा अधिकारी असून गाव नमुना, 7/12 अद्ययावत
ठेवण्याचे काम तलाठी करत असतो.
·
जमिनीसंबंधीची अभिलेख सतत
अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या
नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत.
·
गावात काम करणारा तलाठी
या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये
ठेवतो.
·
तलाठी हा गावातील सर्व
जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा,
आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.
·
ग्रामीण भागाच्या
नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष
ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील
दुव्याचे काम करणे.
·
शासनाचा गाव पातळीवरील
मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन
निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत
असते.
·
नैसर्गिक आपत्तीची माहिती
मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे.
·
महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या
बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे.
·
जिल्हाधिकाऱ्यांच्या
आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून
देणे.
किमान
वयोमर्यादा : Talathi
Bharti Age Limit
तलाठी पदांसाठी
कमीत कमी 18 वर्षे ते आणि जास्तीत जास्त 38 वर्षे वयोमर्यादा ठेवली जाणार आहे. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारास आणि
खेळाडू उमेदवारास -05 वर्षे वयोमर्यादेत सूट देणार येईल, तर प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवार आणि अपंग उमेदवारास – 10 वर्षे शिथिलता दिली जाईल.
तलाठी भरती शैक्षणिक
पात्रता:Educational Eligibility
उमेदवार कोणत्याही
शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
माहिती तंत्रज्ञान
मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.(MSCIT)
मराठी व हिंदी
भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : Talathi
Bharti Required Document
दहावी बारावीचे
प्रमाणपत्र व गुणपत्रिका
ओळखपत्र (आधार
कार्ड,
पॅन कार्ड)
जन्माचा दाखला
पदवीचे प्रमाणपत्र
व सर्व सत्रांचे गुणपत्रक
मागासवर्गीय
असल्यास जातीचे प्रमाणपत्र
आर्थिक दृष्टया
दुर्बल घटकांमध्ये मोडत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र
अपंग असल्यास
अपंगत्वाचे प्रमाणपत्र
पासपोर्ट फोटो तसेच
सही स्कॅन करून ठेवावी.
Talathi Salary in Maharashtra:
महाराष्ट्राच्या
महसूल व वन विभागासाठी महाराष्ट्र तलाठ्यांना सातव्या वेतन आयोगानंतर रु. 5200
ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400/- तलाठी वेतन मिळणार आहे.
हे सर्व भत्ते Basic
Pay वर अवलंबून असतात.तलाठी पदास एकूण मिळणारे वेतन खालीलप्रमाणे
आहे.
Salary
Structure |
Total
Amount in Rs |
Basic
Pay |
25500 |
Dearness
Allowance (DA) 31% |
7905 |
House
Rent Allowance (HRA) |
4590 |
Travelling
Allowance (TA) |
2358 |
Total
Salary |
40353 |
FAQ Regarding Talathi
Bharti 2023
Question 1. तलाठी पदाचा एकूण पगार किती आहे?
Ans. तलाठी
पदाचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 20200-22600 दरम्यान आहे.
Questions 2. तलाठी होण्यासाठी काय करावे लागेल?
Ans. महसूल
विभागातील तलाठी भरती दोन पदांसाठी होत आहे, तलाठी आणि
क्लर्क. तलाठी पदासाठी उमेदवार
मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे. क्लर्क
पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि MSCIT प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
Question 3. तलाठी नियुक्ती कोण करते?
Ans. तलाठ्यांची
नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा
परीक्षांद्वारे केली जाते. तलाठ्याच्या कार्यालयास ‘सजा’
असे म्हणतात. प्रतेक सजा करीता एक किवा अनेक तलाठी असतात.
Question
4 : तलाठी भरती कधी सुरु होणार आहे ?
तलाठी भरती लवकर
सुरु होणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्याची
माहिती आमच्या वेबसाइट वर मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही आमचे Telegram Channel/link/button/#FF5733 ज्वाइन करा |
Question
4 : तलाठी कसे बनायचे?
तलाठी पदासाठी
शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा
नसली तरी किमान पात्रता पदवी आहे. लेखी परीक्षा ही एकच असते. लेखी परीक्षेसाठी
मराठी,
इंग्रजी, सामान्यज्ञान, अंक
गणित हे विषय असतात.
Post a Comment